छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : शहरात मोकाट कुत्र्यांकडून होणार्या हल्ल्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. कुत्र्यांच्या हल्ल्यात शनिवारी (दि.२८) गंभीर जखमी झालेल्या चिमुरडीवर घाटी रुग्णालयात सध्या उपचार सुरू असून, तिची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती घाटीचे अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांनी दिली. तसेच मोकाट कुत्र्यांच्या चाव्यात गंभीर जखमी झालेल्या रुग्णांना देण्यात येणार्या एआरएस लसीचा तुटवडा असल्याचे सांगितले.
नारेगाव येथील चारवर्षीय आयशा सय्यद हिच्यावर पाच ते सहा मोकाट कुत्र्यांनी हल्ला केला. यात जखमी चिमुकलीला कुटुंबीयांनी उपचारासाठी तातडीने घाटी रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, तिच्यावर औषधोपचार सुरू असून, सध्या तिची प्रकृती स्थिर आहे. शनिवारी गंभीर जखमी असताना तिच्या शरीरातील रक्त कमी झाले. त्यामुळे तिला रक्त चढवण्यात आले असून, बालरोग तज्ज्ञ प्रभा खैरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार सुरू आहेत.